जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ.१२वी सायन्सचा विद्यार्थी देवेश सागर परदेशी याची ३ ते ९ जुलै दरम्यान सिंगापूर येथे होणाऱ्या एस.जी. फ्लोअरबॉल आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. त्याच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
निवड झालेल्या या खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे या यशानिमित्त के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे, उपप्राचार्य करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, जिमखाना समिती चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे,सदस्य डॉ.अतुल इंगळे, प्रा.संदीप वानखेडे, प्रा. वर्षा पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.