राष्ट्रीय ऑक्वाथलॉन व ट्रायथलॉन स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंची निवड; पोलीस अधीक्षकांकडून कौतुक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हैदराबाद येथे इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन व तेलंगणा स्टेट ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १६ जुन रोजी मिनी ऑरेंज राष्ट्रीय ऑक्वाथलॉन व ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन गाचीबोली स्टेडियम, हैदराबाद, राज्य तेलंगणा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघाची अजिंक्यपद स्पर्धा बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत आपल्या पोलीस जलतरण तलावच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सबज्युनिअर मुलींच्या गटात- अनुष्का दिपक पोतदार, जूनियर मुलांच्या गटात ओम रवींद्र चौधरी, यश हेमराज झटके यांची निवड झालेली आहे. तसेच या स्पर्धेसाठी तांत्रिक पंच म्हणून पोलिस जलतरण तलावाचे प्रशिक्षक कमलेश नगरकर यांची निवड झालेली आहे.

निवड झालेल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपधीक्षक (गृह) प्रमोद पवार, पोलिस निरीक्षक मानवी संसाधन विभाग बुधवंत यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले

Protected Content