Home Cities जळगाव राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकपदी सीमा झावरे

राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकपदी सीमा झावरे

0
48


जळगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क ( दारूबंदी) विभागाचे जिल्हा अधिक्षक नितीन धार्मिक यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सीमा झावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आणि निरिक्षकांच्या बदल्या आज झाल्या आहेत. यात जळगावचे जिल्हा अधिक्षक नितीन धार्मिक यांची बदली झालेली आहे. त्यांच्या जागी रायगड येथील अधिक्षक सीमा झावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या लागलीच पदभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत श्रीरामपुर येथून निरिक्षक डी.पी. बगाव हे जळगाव येथे येणार असून त्यांच्या नियुक्तीचेही आदेश निघाले आहेत.

नितीन धार्मिक यांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अनेक कारवाया गाजल्या. यात प्रामुख्याने लॉकडाऊनमध्ये काही होलसेल व रिटेल दुकानांवर केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली होती.


Protected Content

Play sound