युरिया न मिळाल्यास शेतकर्‍याचा आत्महत्येचा इशारा ( व्हिडीओ )

रावेर शालीक महाजन । ऐन गरज असतांना बाजारपेठेतून युरिया गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निवडक जणांना याची मुबलक उपलब्धता असली तरी बहुतेक शेतकरी यामुळे त्रस्त झालेले आहेत. यामुळे युरिया न मिळाल्यास एका शेतकर्‍याने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

रावेर शहरासह तालुक्यात सध्या युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. काही जणांना हे खत मिळत असले तरी बहुतेक शेतकरी यापासून वंचित आहेत. यामुळे बरेच जण त्रस्त झालेले आहेत. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने शेतकर्‍यांशी संवाद साधला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रावेरातुन यूरीया सर्व दुर जातोय आम्हालाच दिला जात नाही. याची विक्री करणारे दुकान चालक आठ दिवसा पासुन फिरवत असल्याचा आरोप एका शेतकर्‍याने केला आहे. आपल्याकडे साडे चार एकर जमीन असून केळी व कपाशीला अजुन सुध्दा एकही युरीयाचा डोस मिळाला नाही. आधीच कर्ज काढून शेती केली आहे. कृषी कार्यालयात सुध्दा चकरा मारल्या परंतु सर्व दुर्लक्ष करताय. यूरिया न मिळाल्यास मी आत्महत्या करेल असा इशारा रावेरचे शेतकरी आरीफ खान यांनी दुकानदारांच्या जाचाला कंटाळुन दिला आहे.

खालील व्हिडीओत पहा या संदर्भात शेतकरी नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/228341128389005

Protected Content