जळगाव, प्रतिनिधी | पर्यावरण संतुलन राहण्यासाठी बीज प्रसार मोहीम व वृक्षारोपण मोहीम ही अधिक गतिमान होण्याची गरज आहे , शासनासोबत लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो तरच भविष्यात हिरवे शिवार पाहता येईल असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
रविमेळ समाजसेवा समुहाचे सदस्य यांनी रविवार १८ ऑगस्ट रोजी मेहरुण तलाव किनारी असलेल्या मोकळ्या जागेत आणि परिसरातील डोंगर पठारावर पर्यावरण प्रेमींनी बीज प्रसार मोहीम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात राबविली. या मोहिमेत स्वतःहून पर्यावरण प्रेमी व अप्पर जिल्हाधिकारी श्री.गाडीलकर आवर्जून उपस्थित होते. सदस्यांनी मेहरुण भागात पावसाळी बीज पेरणी उपक्रम राबवला. यावेळी मोहिमेचे संयोजक मनोज चंद्रात्रे , पर्यावरणमित्र तुषार वाघुळदे, पर्यावरण व वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे , मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा, मनोज वाघ , उपेंद्र सपकाळे , अविनाश चव्हाण ,धवल वाघुळदे, स्वप्निल सुर्यवंशी ,राहुल बारी, सतीश सोनार, महेंद्र जैन, कपिल दुसाने आदी उपस्थित होते.यावेळी आंबा, जांभूळ, शेवगा, रिठा,शिकेकाई, आंबा, चिकू, आवळा, खजुर , बदाम, खारीक, चंपा, सिताफळ, लिंबू, नारळ इ. झाडांच्या बिया तसेच गिलके, वाल, भेंडी पेरण्यात आल्या व जंगली प्राणी व पक्षासांठी चारा निर्माण व्हावा म्हणून गहू, ज्वारी, मका, बाजरी आदी त्रृण धान्य पेरण्यात आली. काही गुराखी यांनाही पावसाळ्यात गुरे चारताना तृन धान्ये आण अन्य बीया पेरण्यासाठी स्वयसेवकांनी प्रेरित केले.त्याचप्रमाणे शेकडो सिड्स बॉलही तयार करण्यात येऊन ठिकठिकाणी ते फेकण्यात आले तसेच ज्या ठिकाणी बिया लावण्यात आल्या तिथे लगेचच बाटल्यानंद्वारे पाणीही देण्यात आले .