मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल २६ निर्णय घेण्यात आले आहेत. हे महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे-
- मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर ( मराठी भाषा विभाग)
- पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार ( गृह विभाग)
- अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता ( सामान्य प्रशासन विभाग)
- केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता ( नगरविकास विभाग)
- श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार ( सार्वजनिक बांधकाम विभाग)
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प ( मदत व पुनर्वसन)
- भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज ( वित्त विभाग)
- राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ ( आरोग्य विभाग)
- महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार ( दुग्धविकास विभाग)
- मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार ( जलसंपदा विभाग)
- मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार ( जलसंधारण विभाग)
- शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. ( महिला व बालविकास)
- मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले. (वैद्यकीय शिक्षण)
- आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार. ( कौशल्य विकास)
- कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
- ( ऊर्जा विभाग)
- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग)
- पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)
- पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता ( महसूल विभाग)
- म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
- आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ ( सार्वजनिक आरोग्य विभाग)
- मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार ( परिवहन विभाग)
- मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता ( नगरविकास विभाग)
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते ( ग्रामविकास विभाग)
- भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
- महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन ( महसूल व वन विभाग)
- जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता ( परिवहन विभाग)
- दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना ( पशुसंवर्धन व दुग्धविकास)