जामनेर प्रतिनिधी । येथील इंदिराबाई लालवाणी कनिष्ठ महाविद्यालयात आज विज्ञान कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक विज्ञान शास्त्रज्ञचे अध्यक्ष, रांचो रिसर्च स्कूल जळगाव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि “थ्री इडियट” फिल्म मध्ये स्कूटरचे निर्माते शेख जहांगीर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकाराचे विज्ञान प्रकल्प प्रदर्शन सादर केले. तसेच खराब झालेले स्पेअर पार्ट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खराब झालेले स्पीकर, खराब टूथ ब्रश, प्लास्टिक बॉटल, विविध टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू आदि विविध वस्तूंचा संशोधन करून चांगली वस्तू तयार करावी. त्या वस्तूंचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग वापर करू शकतो, अशा प्रकारचे विज्ञान प्रात्यक्षिक त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पी.आर.वाघ, उपप्राचार्य प्रा.जे.पी. पाटील, विज्ञान शाखा प्रमुख पर्यवेक्षक प्रा.के.एन.मराठे, कला शाखा प्रमुख पर्यवेक्षक प्रा.आर.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रा. माधुरी महाजन, प्रा.के.डी. निमगडे, प्रा.एस.एम.क्षिरसागर, प्रा.सविता महाजन, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा. सचिन गडाख, प्रा.हर्षाली कोळी याचे सहकार्य लाभले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता ११, १२वी विज्ञान विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. समीर घोडेस्वार यांनी केले.