यावल येथील महाजन इंग्लिश स्कुलमध्ये विज्ञान मेळावा उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न  झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  जयंत चौधरी तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक संघ व जी डी कुलकर्णी मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदीर हे यावल होते.

 

डॉ .नरेंद्र महाले सर तालुका विज्ञान अध्यक्ष तथा समन्वयक, संदीप मांडवकर विषय तज्ञ व भूषण वाघुळदे ,सचिन भंगाळे सहसमन्वयक म्हणून लाभले तसेच जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल शाळेचे प्राचार्य श्रीमती रंजना महाजन मॅम व डॉ.किरण खेट्टे सर उपस्थित होते तसेच विश्वनाथ धनके यांच्यासह प्रमुख पाहुणे सर्व  मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

 

डॉ.नरेंद्र महाले तालुका विज्ञान समन्वयक यावल आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असताना सर्व समाजा पर्यंत भरड धान्याची आवश्यक ती माहिती पोहोचवण्यास मदत या उपक्रमांमधून होईल.  यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी व्ही सी धनके यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षीका यांना विज्ञान मेळाव्याबद्दलची अत्यंत सोप्या शब्दात माहिती दिली .

 

या मेळाव्यात वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरड  एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम याविषयी माहिती सांगितली तसेच त्यांची लेखी व तोंडी स्वरूपात परीक्षा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी सौ किरण महाले ,  नितीन बारी ,एच.ए.पाटील ,के.जी. चौधरी ,सुधीर पाटील यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून वैशाली इंगळे, सुनीता पाटील , दिपाली धांडे या शिक्षकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन यांनी केले सौ श्रद्धा बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार श्रीमती राजश्री लोखंडे यांनी मानले. प्रथम प्रणाली किशोर कोष्टी,कुसुमताई विद्यालय,फैजपूर, द्वितीय रेश्मा झांबरे पी एस एम एस स्कुल बामनोद ,तृतीय उज्वला धनराज कोळी,एल एम पाटील विद्यालय राजोरा. यावेळी परीक्षक वैशाली इंगळे, सुनीता पाटील,दीपाली धांडे यांनी काम पाहिले.

Protected Content