खडसे महाविद्यालयात संत रविदासांना अभिवादन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात नुकतेच ग्रंथालय विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन यांनी संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी संत रविदास यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजीव साळवे  प्रा. डॉ.प्रतिभा ढाके,भूगोल विभाग प्रमुख प्रा. पी. पी. लढे प्रा. डॉ. अतुल बढे, प्रा. डॉ. जी. एस. चव्हाण प्रा. पी. एस. प्रेमसागर, प्रा. खेडकर प्रा. डॉ.सी.जे.पाटील प्रा. एस. एम. पाटील  प्रा.खडसे  व महेश महाजन इत्यादी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने संत रविदासांच्या  प्रतिमेस अभिवादन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालयाचे अधिक्षक प्रा. सरोदे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. अधिकारी प्रा. डॉ. बावस्कर, प्रास्ताविक प्रा. डॉ. छाया ठिंगळे तर आभार प्रदर्शन प्रा. विजय डांगे यांनी केले.

Protected Content