Home Cities जामनेर टाकरखेडा शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

टाकरखेडा शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत शुक्रवारी शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला.

मेळाव्यासाठी एक दिवसाच्या अगोदर गावातून दवंडी देण्यात आली होती. तसेच शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी गावातून प्रत्यक्ष गावात फिरून जनजागृती केली. सदर मेळावा हा पोलीस पाटील समाधान पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपाली उघडे, उपाध्यक्ष सोनाली गोसावी, सदस्य आशा सपकाळ, छाया पडोळ तसेच केंद्रप्रमुख विकास वराडे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शाळापूर्व तयारी मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपशिक्षक जयंत शेळके, जयश्री पाटील, छाया पारधे, निर्मला महाजन, नाना धनगर, रामेश्वर आहेर, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच दाखल पात्र विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.


Protected Content

Play sound