चाळीसगाव प्रतिनिधी । शाळेत जाऊन येतो असे सांगून गेलेल्या ५१ वर्षीय शाळेचा शिपाई चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना शहरातील शिवशक्ती नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, शरद वाल्मिक पाटील (वय-५१) रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून शहरातील अभिनव शाळेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. दरम्यान २२ जूलै रोजी सकाळी १० वाजता पाटील हे नेहमीप्रमाणे शाळेत जाऊन येतो असे घरच्यांना सांगून गेले. मात्र शरद पाटील हे आपल्या राहत्या घरी सायंकाळी न परतल्याने घरच्यांनी शाळेत धाव घेतली. त्याठिकाणी याबाबत विचारपूस केली असता पाटील हे शाळेत आलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर पत्नी व मुलाने परिसरात व नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता शरद वाल्मिक पाटील हे मिळून आले नाही. म्हणून घरच्यांना हरवल्याचे स्पष्ट झाल्याने पत्नी सिमा शरद पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.