स्कूलबसची रिक्षाला धडक; चिमुकली जागीच ठार तर एक जखमी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर स्कूलबस व ॲपेरिक्षाच्या धडकेत रिक्षातील तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील पातोंडा येथे पत्नीच्या भेटीसाठी सारसवाडीला गेलेले सायबु बाबु तडवी (वय-३०) रा. आभोडा ता. रावेर हे आपल्या तीन वर्षाची मुलगी महेक सायबु तडवी या चिमुकलीसह ॲपे रिक्षाने रावेरच्या दिशेने येत होते. त्यावेळी बऱ्हाणपुरकडे जाणाऱ्या स्कूल बसने ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली आहे तर सायबु तडवी हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात खानापूर जवळील नवीन चेक पोस्ट जवळ घडला आहे.  जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान स्कूल बस व रिक्शाच्या अपघाताची माहीती मिळताच राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य पी.के. महाजन यांच्या सह नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत एकच गर्दी केली होती. अत्यंत गरीब अठरा विश्व-दारीद्र असलेल्या परीवारावर अपघाताच्या माध्यमातुन संकट कोसळले आहे.

 

Protected Content