माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । माजी सैनिक व विधवांचे दहावी व बारावी परिक्षेमध्ये ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना  शिष्यवृत्तीचे  वाटप  करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी, तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

शिष्यवृत्ती मिळणेबाबत अर्ज करण्यासाठी दिनांक  १५ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत किंवा एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशिरा झाला असल्यास  प्रवेश दिनांकापासून एक महिन्याच्या आत अर्ज स्विकारले जातील, शिष्यवृत्तीसाठी प्राप्त  झालेल्या अर्जाची छाननी  दिनांक १५ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत करण्यात येईल, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार यादी तयार करुन शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल, ज्या पाल्यांनी CET/JEE किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणासोबत Gap Gertificate  (प्रतिज्ञा पत्र) घेऊन शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करावे.

डिप्लोमानंतर व्दितीय वर्षासाठी  प्रवेश  घेतलेल्या  पाल्यांचेही अर्ज स्विकारले जातील, तसेच सदर अर्ज पाल्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या मार्कांची सरासरी काढून त्यांची शिष्यवृत्ती पात्र/अपात्र आहे असे ठरविले जाईल.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतांना फक्त एक वर्षाचे आतीलच अर्ज स्विकारले जातील, त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या व्यक्तींनी अर्ज करु नये, असेही या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

 

 

Protected Content