यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल नगर परिषदेच्या विशेष योजनेंतर्गत एलईडी पथदिवे बसवण्यात मोठा घोटाळा झाला असून या घोटाळ्यात सहभागी कंत्राटदार, विद्युत विभाग, कनिष्ठ बांधकाम अभियंता, लेखापरीक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.चेतन अढळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनव्दारे केली.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत शहरातील विविध भागात सुमारे ५० लाख७ हजार११४ रूपये किमतीची पथदिवे एल ई डी बसविण्यात आली होती. सदरचे ही पथदिवे बसविण्याचा ठेका सर्वात कमी दरातील निविदा करणाऱ्या श्री साई पॉवर प्रा .लि . शिर्डी यांना देण्यात आली होती. त्यानुसार संबंधीत ठेकेदारास १५ टक्के % कमीची निविदा अनुसार त्यांना द्याव्याची रक्कम ही ४२ लाख १६ हजार ४७ रूपये इतकी होते.
याबाबत माहीती अधिकाराच्या माध्यमातुन मिळालेल्या माहीतीनुसार जा. क्र ./ यान. पा / बांध. विभाग/ ६७३ / २०१७व्दारे देण्यात आलेल्या आदेशानुसार ही बाब वर्क ऑर्डरमध्ये नमुद आहे. संबधित ठेकेदारास यानुसार पुर्ण रक्कम देखील अदा करण्यात आली आहे . नगरपरिषद लेखासंहिता १९७१च्या तरदुती नुसार आणी नगर परिषद अधिनियम१९६५च्या तरदुतीनुसार सदरच्या या कामाचे ऑडिट पुन्हा करण्यात आले व याच कामाची रक्कम तांत्रीक मान्यता घेवुन संबंधीत ठेकेदारास ५२ लाख५७ हजार४७० रूपये ईतकी १५ % टक्के कमी करून ४४ लाख ६८ हजार८५० रूपये इतकी देणे हे नियमानुयार अपेक्षीत होते, असे असतांना संबधीत ठेकेदारास निविदा प्रमाणे १५ % टक्के रक्कम ही कमी न करता पुर्ण रक्कम अदा करण्यात आल्याची बाब निर्दशनात आली आहे.
तरी या वैशिष्ठपुर्ण योजनेअंतर्गत झालेल्या पथदिवे कामात यावल नगर परिषदचे कनिष्ठ अभियंता, लेखापाल व इतर अधिकारी यांच्यावर कर्तव्मात कसुर करून या घोटाळयात सहभागी असल्याचे दिसुन येत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या कथित घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करीता समिती बसवुन पुनश्च या पथदिवेच्या कामातील घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करावे. प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी चौकशी कामी सहकार्य म्हणुन माहीती अधिकाराच्या माध्यमातुन मिळालेले दस्ताऐवज सादर करेल. जिल्हधिकारी यांनी या विषयाचे गांर्भीय लक्षात घेवुन तात्काळ चौकशी करून यावलच्या नागरीकांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी केली आहे.