मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवाब मलिक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेल्या पत्रावर खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टिखश केली आहे.
माजी मंत्री नवाब मलिक हे नागपूर अधिवेशनात सत्त्ताधारी बाकांवर बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते अजित पवार गटात सहभागी झाल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले होते. मात्र याच कारणावरून सोशल मीडियातून प्रचंड टिका करण्यात आली. तसेच विरोधक देखील आक्रमक होत असल्याचे पाहताच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना पक्षात प्रवेश देऊ नये असे सुचविले होते.
या प्रकारावर आज शिवसेना-उबाठा पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टिका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. यात नवाब मलिक यांना प्रफुल्ल पटेल हे पेढा भरवत असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे याकडे कौतुकाने पाहत आहेत. हा फोटो ट्विट करतांना त्यांनी ऐसी बात बोलिए, के कोई न बोले झूठ…| और ऐसी जगह बैठिए के कोई न बोले उठ..! ॥ असे कॅप्शन दिले आहे.
तसेच यासोबत त्यांनी नवीन ट्विट केले असून यात म्हटले आहे की, अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, एऊ फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे.. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टिखा केली आहे.