सावदा प्रतिनिधी । नागरीक सुधारणा कायदा समर्थनार्थ सावदा येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिक कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून महामोर्चात स्वयमस्फूरतिने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय सुरक्षा मंच आयोजित व देशभरात याला होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर सी.ए.ए.कायद्याच्या समर्थनार्थ मंगळवारी सावदा येथे दिनांक २४ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील दुर्गा माता चौकातून निघालेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील सर्व सामान्य नागरिकांसह शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर, मंडळी वकील याची उपस्थिती लाक्षणिय होती.
तिरंगा ध्वजाचे आकर्षण
महामोर्चात सुमारे ६ बाय २५० फूट लांबीचा तिरंगा ध्वज राष्ट् प्रेमी भारतीय नागरीकांनी हातात धरुन धरून मोर्चाची आकर्षणात वाढ केली होती. या मोर्चात परिसरातून उपस्थित असलेल्या हजारो नागरिक नागरी सुरक्षा कायदा त्या समर्थनार्थ विविध घोषणा देऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असताना नागरिकांनी इमारतीवरून पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत होता. सदर मोर्चा पोलिस स्टेशन आवारात आल्यावर तिथे राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने उपस्थित ॲड. कालिदास ठाकूर, चंद्रशेखर पाटील, डॉ. वारके, डॉ.कोळंबे, डॉ. तुषार पाटील डॉ. स्वप्नील पाटील, स्वप्नील भंगाळे, नगराध्यक्ष अनिता येवले, खासदार रक्षाताई खडसे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कृउबास सभापती श्रीकांत महाजन, नगरपालिका गटनेते अजय भारंबे, जगदीश बढे, सागर चौधरी, सागर पाटील, विनोद नेमाडे, अक्षय सरोदे, राजेंद्र चौधरी यांच्यासह शहरातील आजी-माजी नगरसेवक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव तसेच सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल वाघ, पवार यांचे उपस्थितीत मंडळाधिकारी शरीफ तडवी यांनी निवेदन स्वीकारले.