Home Cities अमळनेर अॅड.ललिता पाटील स्कूल अमळनेरमध्ये सावित्रीबाई फुले जयंती पालकांसमवेत साजरी

अॅड.ललिता पाटील स्कूल अमळनेरमध्ये सावित्रीबाई फुले जयंती पालकांसमवेत साजरी

0
79

अमळनेर प्रतिनिधी | अॅड.ललिता पाटील स्कूल येथे क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पालक मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित पालकांसमवेत जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष अॅड.ललिता पाटील स्कूलचे प्राचार्य विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे संचालक पराग पाटील यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीम पठाण यांनी तर आभार प्रदर्शन केदार देशमुख यांनी केले.


Protected Content

Play sound