Home Cities जामनेर शेंदुर्णी ललवाणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

शेंदुर्णी ललवाणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0
100

शेंदुर्णी प्रतिनिधी | येथील स्वर्गीय शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे प्राचार्य श्री खलचे व उच्च माध्यमिक विभागप्रमुख व्हि.के.वाघ यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राचार्य खलचे व अध्यक्ष प्रा.ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अपेक्षा पाटील, मोहित चौधरी, आमिन तडवी, अश्विनी करपे, मयुरेश मानकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक व्हि.के वाघ. यांनी केले. सूत्रसंचालन मयुरेश मानकर केले तर आभार विक्रांत जगताप यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound