पोलिस ठाण्यात अश्लील शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

भंडारा, प्रतिनिधी | पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून गोंधळ घालणे एका राष्ट्रवादीच्या आमदाराला महागात पडले आहे. याप्रकरणी आमदारांवर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांना मोहाडी पोलिस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ करुन गोंधळ घालणे चांगलेच महागात पडले आहे. आ. राजू कारेमोरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन भंडारा येथे त्यांना अटक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजीच्या रात्री तुमसर येथील व्यापारी भंडाराकडून तुमसरकडे कारने जात असताना मोहाडी शहराबाहेर असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर असलेल्या पोलिसांनी व्यापाऱ्याला मारहाण करून कारमध्ये ठेवलेले ५० लक्ष रुपये लुटल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

Protected Content