सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तासखेडा येथील जि.प. शाळेच्या आवारात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील तासखेडा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या आवारात कुणी तरी रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला. आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले. कुणी तरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ही माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे तसेच पोलीस निरिक्षक देवीदास इंगवले हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल होत आहेत. पुतळा बसविल्यानंतर गावात थोडा वेळ गोंधळ उडाला असला तरी प्रशासन यावर तात्काळ शांततेच्या मार्गाने तोडगा काढणार असल्याची माहिती सूत्रांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.