Home राजकीय सावदा येथे भाजपच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद

सावदा येथे भाजपच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद

0
27

savda melava

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे बुथ प्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याला उदंड प्रतिसाद लाभला आहे.

सावदा येथील जेहरा मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यास दुपारी प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खासदार सुभाष भामरे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण, कृषी विस्तार व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण, कृषी विस्तार व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे यांच्या कार्याचा वृत्तांत असणार्‍या बांधिलकी पुस्तीकेचे प्रकाशन ना. मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. या मेळाव्यास पक्षाचे शक्ती केंद्रप्रमुख, शाखाध्यक्ष, बूथ प्रमुख, बुथ समिती, पेज प्रमुख गण, प्रमुख, गटप्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आघाड्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व कार्यकर्ते उपस्थित होते.

(सविस्तर वृत्त लवकरच)


Protected Content

Play sound