सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. यात विकास तुकाराम चौधरी वा सौ. जयश्री अतुल नेहेते यांच्यापैकी एकाची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे.
सावदा येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. यासाठी पालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष शबना मुराद तडवी यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमिवर विकास तुकाराम चौधरी अथवा जयश्री अतुल नेहेते यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. हे दोन्ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाकडूनच निवडून आलेले आहेत. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने दोघांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता नेते जी जबाबदारी देतील ती आपण समर्थपणे पार पाडू असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उद्या होणार्या उपनगराध्यक्षच्या निवडीत विरोधकांकडून उमेदवारी देण्याची शक्यता तशी कमी आहे. याबाबत विरोधी गटात सध्या तरी कोणतीही हालचाल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news