व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सौरभ वर्माला विजेतेपद

saurabh varma

मुंबई वृत्तसंस्था । हो ची मिंच सिटी येथे रविवारी झालेल्या व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, सौरभचे हे यंदाच्या वर्षातील तिसरे विजेतेपद आहे. याआधी त्याने हैदराबाद ओपन व स्लोवेनियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यंदाचा राष्ट्रीय विजेत्या सौरभने पहिल्या गेममध्ये सलग चार पॉइंट घेत जोरदार सुरुवात केली. ब्रेक झाला तेव्हा सौरभकडे ११-४ अशी आघाडी होती. ब्रेकनंतरही सौरभने शियांगला प्रतिकाराची फारशी संधी न देता पहिल्या गेममध्ये बाजी मारली. जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये २६ वर्षीय सौरभ ३८व्या, तर सन फेइ शियांग ६८व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे दोघे दोन वेळा आमनेसामने आले होते. त्यात सौरभनेच बाजी मारली होती. २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या कोरिय ओपन या सुपर ५०० गुणांच्या स्पर्धेत आता सौरभ भाग घेणार आहे. ब्रेक झाला तेव्हा शियांगकडे ११-५ अशी आघाडी होती. ब्रेकनंतर सौरभने कडवी झुंज दिली. मात्र, शियांगने आघाडी न गमावता गेम जिंकला आणि आव्हानही राखले. ही लढत १ तास १२ मिनिटे चालली. निर्णायक, तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीला दोघांत चुरस पाहायला मिळाली. ६-६ बरोबरी असताना सौरभने सलग चार पॉइंट घेत आघाडी मिळविली. अंतिम लढतीत त्याने चीनच्या सुन फेई शियांगला पराभवाचा धक्का दिला.

Protected Content