Home धर्म-समाज जनार्दन हरीजी महाराजांचा आजपासून मध्यप्रदेशात सत्संग

जनार्दन हरीजी महाराजांचा आजपासून मध्यप्रदेशात सत्संग

0
103

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा आजपासून तीन दिवसांचा महाशिवरात्री सत्संग महोत्सवास प्रारंभ होत आहे.

सतपंत देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज Mahamandseshvar JAnardan Hariji Maharaj यांचा मध्यप्रदेशातील चापोरा येथे तीन दिवसांचा महाशिवरात्री सत्संग सुरू होत आहे. दररोज दुपारी एक ते चार या कालावधीत हा सत्संग चापोरा येथील बसस्थानकाजवळ असलेल्या नवनाथ मंदिराजच्या जवळ आयोजीत करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचा आज सायंकाळी सात वाजता शुभारंभ होणार आहे. उद्या आणि परवा दुपारी सत्संग होणार आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी महाशिवाभिषेक करण्यात येणार आहे. याप्रसंगी अखील भारतीय संत समितीचे जिल्हाध्यक्ष नर्मदानंदजी महाराज, जिल्हा संरक्षक पुष्करानंद महाराज, प्रदेश उपाध्यक्ष योगेश चतुर्वेदी गुरूजी यांची उपस्थिती राहणार आहे. तर या कार्यक्रमाला प्रल्हादजी महाराज, महेशसिंग चव्हाण, सुजय चौकसे आणि डॉ. राजेंद्र सिंघल उपस्थित राहणार आहेत. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound