Home क्राईम सातोद येथील 27 वर्षीय तरूणाची विष आत्महत्या

सातोद येथील 27 वर्षीय तरूणाची विष आत्महत्या


Crime

जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातोद येथील 27 वर्षीय तरूणाने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सातोद गावातील दर्गाजवळ आढळून आला. याबाबत यावल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय बुधा वाघ (वय 27) रा. सातोद ता. यावल याचे यावल तालुक्यातील डिगर येथे सासरच्या गावाला जातो असे सांगून मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घरातू बाहेर पडला. त्यानंतर तो सासरी न पोहचता सातोद गावातील दर्गाजवळ विषारी औषध घेवून मृतावस्थेत आढळून आला. याबाबत यावल पोलीसांशी संपर्क करून घटनेची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयत संजय वाघ यांच्या पश्चात पत्नी आणि सहा महिन्याची मुलगी असा परीवार आहे. या घटनेबाबत यावल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास यावल पोलीस अधिकारी करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound