यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते सातपुडयाच्या कुशीतुन वाहणार्या हडकाई खडकाई नदीत जलपुजन करण्यात आले.
सातोद येथून वाहणार्या हडकाई-खडकाई नदीपात्रात माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या जलपुजनप्रसंगी यावल पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, जिल्हा परिषद गटनेता तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक नितिन चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, अमोल भिरुड, राजु महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिरीष महाराज यांनी पुजाअर्चना करून जलपुजन करण्यात आली. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी कोळवद ग्रामपंचायत सदस्य रमेश खुशाल पाटील, प्रसन्न महाजन, मसाकाचे संचालक अनिल पाटील, महेन्द्र बोंडे, धीरज कुरकुरे, अभय महाजन, डिगंबर किरंगे, विकास पाटील व उमेश बोंडे यांनी सहकार्य केले.