Home Cities भुसावळ भुसावळात सतीश घुले यांचा परिवर्तनाचा नारा

भुसावळात सतीश घुले यांचा परिवर्तनाचा नारा

0
32


satish ghule

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी शहरासह तालुक्यात झंझावाती प्रचार सुरू केला असून परिवर्तनाचा नारा बुलंद केला आहे.

सतीश घुले यांनी वैयक्तीक आणि सामूहिक या दोन्ही पातळ्यांवर प्रचारास प्रारंभ केला आहे. शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागात त्यांनी प्रचार फेर्‍या काढल्या असून यासोबत वैयक्तीक गाठीभेटीदेखील घेतल्या आहेत. भुसावळ मतदारसंघ हा विकासापासून कोसो दूर असून आपण निवडून आल्यानंतर विकासाचे नवीन पर्व सुरू करणार असल्याची ग्वाही ते प्रचारातून मतदारांना देत आहेत. सर्वांगीण विकासासाठी भुसावळात परिवर्तन हवे अशी साद त्यांनी मतदारांना घातली असून त्यांचे ठिकठिकाणी अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे.


Protected Content

Play sound