औरंगाबाद । मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय संपादन करून विजयाची हॅटट्रीक केली आहे.
राठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला आहे. या मतदारसघाच्या निवडणुकीत एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी तब्बल २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. यात सतीश चव्हाण यांना एकूण ११६६३८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मते मिळाली. या निवडणुकीत ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण ५७८९५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत त्यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रीक पूर्ण केली आहे.