भुसावळ प्रतिनिधी । सीएम चषक स्पर्धेत येथील सतेज क्रीडा मंडळाचा मुलींचा संघ हा जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून या संघाला रवाना करण्यात आले.
सीएम चषक २०१८-१९ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सतेज क्रिडा मंडळाच्या मुलींनी तालुका, जिल्हास्तर प्रतिस्पर्धी संघावर आपल्या नेत्रदीपक खेळाच्या जोरावर मात करून दादर मुंबई येथे होणार्या सी.एम. चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सतेज संघ पात्र ठरलेला आहे. हा संघ नुकताच रवाना झाला आहे. या संघास भुसावळ चे आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी शिक्षण सभापती , बोधराज चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक किशोर पाटील, पिंटू ठाकुर, सतीश सपकाळे व भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील तसेच द. शि. विद्यालयाचे प्राचार्य जे. बी. राणे आणि एस. पी. पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना सतेज क्रिडा मंडळाचे अध्यक्ष बी.एन.पाटील व सचिव सचिन राजपूत व माजी आजी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत जागृती सुभाष काकडे ( कर्णधार ), हेमानी लिलाधरसिंह कंवर, नंदिनी दिलिप पाटील, सिमरन नरेश रणित, ज्योती भगवान पवार, संध्या शांताराम नरवाडे, दिपाली सुरज श्रीवास्तव, सोनाली गणेश बनसोडे, मनिषा भगवान पवार, सेजल धर्मेश पानपाटिल, काजल राजेश बारोट व दुर्गा हरी अहिरे आदी खेळाडू जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.