रावेर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील सात गावाचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदाच्या अनुसुचित क्षेत्रातील एक द्वितियांश आरक्षण सोडत आज काढण्यात आले. तेरा ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायतीत महिला सरपंच राहणार आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी देवयानी यादव यांचे उपस्थितीत तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रतील तेरा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदापैकी एक द्वितियांश सरपंच पदे पूर्णतः महिलांसाठी आरक्षीत करणे साठी आरक्षण सोडत येथील तहसील कार्यालयात काढण्यात आले.

तालुक्यातील तेरा आदिवासी अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या नावाने चिठ्या तयार करून एका आठ वर्षीय रेहान तडवी या मुलाच्या हातून वरील तेरा पैकी ७ चिठ्या काढण्यात आल्या . यात जूनोने-मंगरूळ गृप, अभोडे बु. गृप, सहस्त्रलिंग गृप, कुसुंबे बु., कुसुंबे खूर्द, निमड्या, जिन्सि गृप या सात ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी आरक्षण काढण्यासाठी सहकार्य केले. या क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते .

Protected Content