संरक्षणभिंत कोसळल्याने तरूण गंभीर

jakhami 1

जळगाव प्रतिनिधी । गटारीच्या कामासाठी खोदकाम करत असतांना तरूणांच्या अंगावर संरक्षण भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कुठलीही नोंद झालेली नाही.

 

याबाबत माहिती अशी की, आत्माराम हिरामण सोनवणे (वय-30) रा. पिंप्राळा हे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या गटरीच्या बांधण्यासाठी खोदकाम करत असतांना बाजूला उभी असलेली जीर्ण असलेली संरक्षण भिंत अचानकपणे अंगावर कोसळली. यात आत्माराम सोनवणे हे दबले गेले. सोबत काम करणाऱ्या मजूरांनी त्यांना बाहेर काढले. यात त्यांच्या उजव्या हात, डावा पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत सोनवणे यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्या आले आहे. याबाबत अद्याप पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content