इतिवृत्तातील बदलावरून स्थायी सभेत गोंधळ

WhatsApp Image 2019 07 29 at 3.43.38 PM

जळगाव, प्रतिनिधी | इतिवृत्ताच्या विषयावर नानीबाई रुग्णालयाच्या झालेल्या ठरावात दुरुस्ती बाबत भाजप सदस्य भगत बालाणी यांनी मांडला. यावर शिवसेनेचे नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे यांनी आक्रमक होवून सत्ताधारी चुकीचा पायंडा पाडत आहेत. हे नियमात बसणारे नसल्याने तुम्हाला बदल करायचा असेल तर पुढील सभेत नविन ठराव घ्यावा अशी मागणी स्थायी सभेत केली केली.

महापालिकेची आज स्थायी समितीची सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त उत्कर्ष गुट्टे, उपायुक्त दिनानाथ दंडवते, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. इतिवृत्ताच्या विषयावर सत्ताधारी व विरोधाकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा विषय बहुमताने मंजूर करत शिवसेने विरोध दर्शवीत सुचना मांडल्या. तर एमआयएमचे सदस्य रियाज बागवान यांनी तटस्थ राहण्याची भुमीका घेतली. स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवरील विषयावर मंजूरी दिल्यानंतर सभा समाप्त झाली असे सभापतींनी जाहीर केले. यावर विरोधी सदस्यांनी शहरातील समस्यांबाबत चर्चा करावी अशी मागणी लाऊन धरत विरोधकांनी गोंधळ घालत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी टाळाटळ करत असल्याचा आरोप केला. चर्चेदरम्यान सात्ताधारी भाजप सदस्या उज्वला बेंडाळे यांनी अमृत योजनेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत आमदार, महापौरांनी बैठक घेवून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. तरी देखील गिरणा टाकी रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नसून तेथे अपघात होत आहे. मक्तेदार प्रशासनाचे एकत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांना विनाकारण नागरिकांच्या रोषाला समारे जावे लागत असल्याये मत मांडले. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असतांना वाघुर धरणातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यानुसार शहराचा दोन दिवसावरून पाणीपुरवठा तीन दिवसाआड केला. परंतू, एक दिवस वाढवून देखील पाण्याची मागणी तेवढीच असल्याचे शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. धरणात आता पाणीसाठा वाढला असून पुन्हा शहराचा पाणी पुरवठा हा दोन दिवसाआड करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. यावर सभापतीं जितेंद्र मराठे यांनी याबाबत आज बैठक घेवून पाणीसाठी लक्षात घेता निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

कूत्रे पकडून मालगाडीतून पाठवा – बरडे
शहरातील कुत्र्यांची समस्यांबाबत भाजप सदस्य अॅड. शुचीता हाडा यांनी समस्या मांडली. यावर सात वेळा निविदा काढून देखील प्रतिसाद मिळत नाही. आयुक्त डॉ. टेकाळे म्हणाले, की जाचक अटी कमी केल्या असून लवकरच निविदा काढली जाणार असे सांगितले. तसेच एमआयएमचे सदस्यांनी समस्या मांडली यावर सभापतींनी तुम्हीच कोणी निविदा घेईल यावर प्रयत्न करा असा सल्ला दिला. यावर शिवसेना सदस्य नितीन बरडे यांनी महापालिकेने कुत्रे पकडून द्यावे, मी खर्च करून मालगाडीतून मेनका गांधीना हे कुत्रे भेट म्हणून पाठवितो असे सांगितले.

Protected Content