Home Cities जळगाव संत सेना महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

संत सेना महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

0
51

जळगाव प्रतिनिधी । श्री संत सेना महाराज जयंती उत्सवानिमित्ताने १६ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई अंतर्गत श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ समितीतर्फे श्री संत सेना महाराज जयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यात १६ मे रोजी दुपारी १ वाजता प्रतिमा पूजन, आरती करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक नेहरू चौकातून प्रारंभ होऊन सायंकाळी ५ वाजता सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालयात मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे. यात प्रदेश कार्याध्यक्ष किशोर सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष एकनाथ शिरसाठ, ईश्‍वर मोरे, डॉ. प्रकाश चित्ते, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा सुर्वे, राजेंद्र सूर्यवंशी, अश्‍विनी हिरे आदींची उपस्थिती राहणार आहे. समाजबांधवांनी यात उपस्थित राहण्याचे आवाहन शहर संघटनेचे अध्यक्ष जगदीश निकम यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound