जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री संत सेना नाभिक समाज मंडळातर्फे आज श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची जयंती उत्सवाने साजरी करण्यात आली. उत्सवाच्या निमित्ताने भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती, मात्र राष्ट्रीय हिताचा विचार करून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंधन बचत’ आवाहनाला प्रतिसाद देत रॅली रद्द करण्याचा समाज बांधवांनी आदर्श निर्णय घेतला.
नियोजित कार्यक्रमानुसार, सकाळी शिवतीर्थ मैदानापासून पंढरपूर गोशाळेपर्यंत रॅली काढण्यात येणार होती. या रॅलीसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव दुचाकींसह उपस्थित झाले होते. परंतु, ऐनवेळी इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सामाजिक जबाबदारी आणि जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे समोर आला.

रॅली रद्द केल्यामुळे उत्साहात काहीही घट बसली नाही. शिवतीर्थ मैदान परिसरात सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन श्री संत शिरोमणी सेना महाराजांचा जयघोष केला. भक्तीमय वातावरणात, शिस्तबद्ध पद्धतीने घोषणाबाजी करत उत्सवाचे सांगता करण्यात आली आणि उपस्थितांचे उत्साहात सहभागी होणे पाहून समाजाची एकजूट स्पष्टपणे दिसून आली.
उत्सवात समाजातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष जगन्नाथ वखरे, कांतीलाल वाघ, उपाध्यक्ष रमेश शिंदे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनोज बिडे व कृष्णा अहिराणे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ प्रदर्शन किंवा रॅलीचा नाही तर सामाजिक जबाबदारी राखणे महत्त्वाचे आहे, हा संदेश नाभिक समाजाने आपल्या निर्णयातून दिला. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक सर्व स्तरांतून होत आहे.



