श्री निष्कलंक धाम वढोदा येथे संत संमेलन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्येत निर्माण झालेले श्रीराम मंदिरामुळे देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आता यापुढे समाजात धर्म जागरण संस्था देवगिरी प्रांत यांनी पुढाकार घेऊन भविष्यात संत, महंत, कथाकार, कीर्तनकार, पुजारी, प्रवचनकार, भगत यांच्यामार्फत कुटुंब प्रबोधनासाठी श्री निष्कलंकधाम वढोदा येथे संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात मराठवाडा व खानदेश मिळून १६ जिल्ह्यांमधून जवळपास २५० संत महंत प्रवचनकार कथाकार आदींची उपस्थिती लाभली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता प्रथम सत्र होऊन दुसऱ्या दिवशी चार सत्रांमध्ये संत संमेलनात विस्तृत चर्चा होणार आहे. यात समाजात होत असलेले पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण, पर्यावरणाचा ऱ्हास, धर्मांतरण, लव्ह जिहाद, व्यसनाधीनता, सेंद्रिय शेतीकडे होत असलेले दुर्लक्ष व त्यापासून होणारे दुष्परिणाम या सर्व बारीक-सारीक गोष्टींचा सखोल अभ्यास करून चर्चा होणार आहे. समाज घातक सर्व बाबींवर उपाययोजना करण्यावर चर्चासत्रांमध्ये भर राहील. या संत संमेलनात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित सर्व संत महात्मे यापुढे समाजात प्रबोधन करणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज, धर्म जागरण संस्थेचे योगी दत्तानाथजी, श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Protected Content