मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे आदिशक्ती मुक्ताई यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर आधी चौघा भावंडांमध्ये अतिशय लडिवाळ असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत, आपल्या परखड अभंग वाणीतून थोर कवयित्री म्हणून ओळख असणाऱ्या मुक्ताबाई यांचा अश्विन मासातील नवरात्रोत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना शुभदिनी अवतीर्ण झाल्याने मुक्ताई साहेबांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निश्चय करून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तापी पूर्णा परिसर सेवेकरांतर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई चंडी सेवा अंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो सेवेकरी तसेच संत मुक्ताई फळावरील वारकरी, टाळकरी व फडकरी कीर्तनकार मंडळी सहभागी झाले होते. दुर्गा सप्तशती पाठांतर आदिशक्ती मुक्ताई साहेबांच्या चरित्र गाथेतून त्यांच्या जन्मोत्सवाचा अध्याय वाचून आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात पुष्पवृष्टी करून संत मुक्ताई साहेबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तत्पूव पहाटे संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांचे हस्ते आई मुक्ताईस महापूजा अभिषेक आरती करण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रोहिणी खडसे, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज,संत मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पाटील, आ.चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील, निवृत्ती पाटील, व्यवस्थापक उद्धव महाराज जूनारे, पुरुषोत्तम वंजारी यांचेसह हजारो महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते.
मुक्ताईनगर येथे संत मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा
2 months ago
No Comments