Home Cities जळगाव संत बाबा जुडयाराम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजू कुटुंबांना किराणा वाटप

संत बाबा जुडयाराम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजू कुटुंबांना किराणा वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संत बाबा जुडयाराम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू आणि वंचित कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. यावर्षी ट्रस्टतर्फे सुमारे १२० गरजू कुटुंबांना संसारोपयोगी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत झाली आहे. ट्रस्ट गेली अनेक वर्षांपासून सातत्याने अशा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.

ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजातील गरज ओळखणे आणि त्यांना योग्य वेळी मदत करणे हेच बाबा जुडयाराम यांच्या शिकवणीचे पालन आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे आणि देणगीदारांचे त्यांनी आभार मानले. भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस ट्रस्टने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound