जळगाव, प्रतिनिधी | शहरात उद्या दि.३० जुलै रोजी राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६६९ वा संजीवन समाधी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळ आणि संत नामदेव महिला व भक्ती महिला मंडळ यांचेसह शहरातील विविध भागातील शिंपी समाजाच्या शाखांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता पांझरापोळ परिसरातील जगताप मंगल कार्यालयात समाजाध्यक्ष राजेंद्र सोनवणे-मनीषा सोनवणे आणि उपाध्यक्ष विवेक जगताप- भाग्यश्री जगताप यांचे हस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पूजन झाल्यावर शोभायात्रेला प्रारंभ होईल. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आ. एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, आ.राजूमामा भोळे, आ. चंदुलाल पटेल, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, अ.भा.मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त दिलीप भांडारकर, जि.प.चे कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शिंपी, एड.सुभाष चव्हाण, पोपटराव शिंपी या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शोभायात्रेचा समारोप दुपारी १२ वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे होणार असून यावेळी निलेश दिलीप भांडारकर आणि प्रांजल विलास सोनवणी यांचा विशेष सत्कार होणार आहे. यावेळी वैद्य मधुकर बागुल हे सांधेदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, सोरायसिस, मधुमेह यावरील औषधी मोफत वितरीत करणार आहेत. समाजबांधवानी सफेद वस्त्र परिधान करून शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सचिव चंद्रकांत जगताप, सहसचिव दीपक जगताप, संजय जगताप, मुकुंद मेटकर, शिवाजी शिंपी, सतीश जगताप, मनोज भांडारकर, राजेंद्र बाविस्कर, प्रशांत कापुरे यांनी केले आहे.