चाळीसगाव प्रतिनिधी । संजय संभाजी सोनवणे यांची भारतीय बहुजन महासंघ संलग्नित बहुजन चित्रपट कामगार महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना या पदाबाबतचे नियुक्तीपत्र या संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद हिवाळे यांनी त्यांना दिले आहे. त्यांनी अहिराणी चित्रपट सुट्टीत उत्तम अभिनय केला आहे. अहिराणी चित्रपट गीते तसेच सप्तशृंगी देवीची महिमा सांगणारे गीते यांच्या माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळवला आहे. खान्देशातील कलाकार पुष्पा ठाकूर नितीन कुमावत वनमाला बागुल डुबर्या भाई यांना घेऊन त्यांनी अनेक गीते व चित्रपट यांच्यामध्ये निर्मितीत योगदान दिले आहे. याची दखल घेऊन त्यांच्याकडे ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याने अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.