मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या जे काही सुरू आहे त्यातून महाराष्ट्रात नवीन क्रांती होणार असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
पत्रचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत हे सध्या कारागृहात आहेत. आज त्यांनी न्यायालयात तारीख असल्याने त्यांना न्यायालयात आले असतांना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष् य केले.
नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. या आधीही अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी आपापल्या पक्षांचे नाव आणि निशाण्यांचा प्राधान्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केला असून यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.