संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सत्तांतर होत असतांनाच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपण उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी उद्या हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. आज पत्रकारांशी बोलतांना त्यांनी बंडखोरांसह भाजपवर टिकास्त्र सोडले.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी उद्या दुपारी चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयासमोर अर्थात ईडीसमोर हजर होणार आहे.  ईडीसमोर हजर होऊन माझी भूमिका मांडेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी हे सगळे दबाव सुरु आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या याच दबावामुळे आमच्या पक्षातील काहीजण पळून गेले. पण मी उद्या दुपारपर्यंत ईडीसमोर चौकशीसाठी हजर होईन. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईन, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले की, बंडखोरी करून हाडाचे शिवसैनिक फुटल्याचे दु:ख जास्त आहे. कोणत्याही कारणाने पाठीत खंजीर खुपसायचं, मग कारणं का देताय, शरद पवारांना दोष देताय, बहुसंख्य लोकांचं पालन पोषण शरद पवारांनी राष्ट्रवादीने केलंय, मंत्रिपदासाठी हे लोक फक्त आपल्याकडे आले होते, तरी हाडाचे शिवसैनिक त्यामध्ये गेले, याचं दु:ख, उद्धव ठाकरे कालपर्यंत बोलवत होते, काल त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळला होता सरकार पाडायचा, ते त्यांनी करुन दाखवलंमहाराष्ट्रात सत्तापरिवर्तन काय होणार माहिती नाही, धुणीभांडीच करावी लागणार आहेत ना तुम्हाला, असे म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.

 

Protected Content