मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत’ अशा एकेरी शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसापासून सतत भाजपवर टीका करत आहेत. यावर भाजपमधून फार प्रतिउत्तर देण्यात येत नाहीय. परंतू नुकतेच भाजपवासी झालेले माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊतांवर एकेरी भाषेत टीका केली आहे. राणे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मीटिंग करायची ह्यांनी, एनडीएची मीटिंग शिवसेनेने नाकारली, पण संजय राऊत गल्लीतल्या त्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत, जे सगळे ठीक असेल, तरी सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालतात.’ असेही ट्वीटमध्ये निलेश राणेंनी म्हटले आहे.