पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर राऊत संपला असता : निलेश राणे

 

rane and raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्यासारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर, असे ट्विट भाजपचे नेते निलेश राणे यांनी केले आहे.

 

संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अनेक गौप्यस्फोट केले. पत्रकारितेतील कारकिर्दीबद्दल सांगताना संजय राऊत यांनी दाऊदचा उल्लेख केला होता. ‘मी दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊदला दम देखील दिलाय’, असे राऊत म्हणाले होते. त्यावर निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट केले आहे. निलेश राणेंनी संजय राऊत यांची तुलना थेट पिसाळलेल्या कुत्र्याशी केली आहे. निलेश राणे यांच्या ट्विटमुळे शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

Protected Content