मनी लाँडरिंग प्रकरणी टोनी फर्नांडिस यांना नोटीस जारी

VBK Enforcement Directorate ed

 

मुंबई प्रतिनिधी । सक्तवसुली संचलनालयाने २०१८ साली एअर एशिया आणि कंपनीतील काही अधिकाऱ्यांविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्याप्रकरणी आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांना ही ईडीने नोटीस जारी केली असून येत्या २० जानेवारी रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एअर एशिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस अडचणीत सापडले आहेत. एअर एशियाची भारतीय कंपनी एअर एशिया इंडियासाठी आंतरराष्ट्रीय परवाना मिळावा म्हणून एअर एशियाच्या अधिकाऱ्यांनी धोरणांचा गैरवापर करून सरकारची दिशाभूल केल्याचा संशय ‘ईडी’ने व्यक्त केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याशिवाय परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. एअर एशियावर यापूर्वीच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय आणि ईडीकडून टोनी फर्नांडिस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. फर्नांडिस यांच्यासह कंपनीचे डेप्युटी ग्रुप सीईओ बो लिंगम, एअर एशिया इंडियाचे संचालक आर. वेंकटरमण, एअर एशिया इंडिया आणि एअर एशिया बरहाड या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी एअर एशियात २२ कोटींचा बेकायदा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

Protected Content