चक्क वधू-वराने केले वऱ्हाडींचे सॅनिटाझेशन

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथे एका राजकीय नेत्याच्या मुलाच्या विवाहप्रसंगी वर व वधू यांनी त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडीला सॅनिटाइझ करून सभा मंडपात सोडल्याने त्याच्या जागृतीची सर्वत्र कौतुक होत आहे.

भुसावळ येथिल एका नामांकीत हॉटेलमध्ये भुसावळचे राष्ट्रवादी कॉगेसचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक मोहन निकम यांचा मुलगा विवेक व कुर्ला येथिल आकांक्षा यांचा विवाह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊच्या नियमांनुसार साध्या पध्दतीने पार पडला.

लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे आधी सॅनिटायझेशन करण्यात आले. हे सॅनिटायझेशन चक्क वर व वधू यांनी केले. यानंतर या पाहुण्यांना सभा मंडपात (हॉल) मध्ये प्रवेश दिला गेला. गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता असे केले असल्याचे वर विवेक व वधू आकांक्षा यांनी सांगितले. याप्रकारे जर सर्वांनी काळजी घेतली तर लवकरच कोरोनाचे रुग्ण शहरात कमी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Protected Content