यावल प्रतिनिधी । शहरातील साने गुरूजी विद्यालयात 9 मार्च 2019 रोजी तीन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती अनधिकृत असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी जि.प.शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे या भरतीला शासकीय मान्यता देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले होता. सदरील भरती अनधिकृत असून ती तत्काळ रद्द करावेअसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावल नगरपरिषदेला पत्राद्वारे कळविले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील साने गुरूजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 9 मार्च 2019 रोजी तीन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही भरती अनधिकृत असल्याची तक्रार यावल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जि.प.शिक्षणाधिकारी यांच्याकडे 26 मार्च आणि 5 एप्रिल 2019 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांनी 27 मे 2019 चौकशीचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावर शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील जिल्हा परिषद यांच्याकडून शिक्षकेतर भरतीची कोणतीही परवानगी नसल्याने ही भरती तत्काळ रद्द करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावल मुख्याधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले असून या कारवाईचा अहवाल पाच दिवसाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
कारवाई करण्याची केली होती मागणी
माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील आणि नगरसेवक राकेश कोलते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार यावल नगरपरिषद व्दारे संचलीत साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी अनाधिकृत भरतीला शालेय समितीचे अध्यक्ष आणी सचिव हे देखील जबाबदार असुन यांच्यावर कायद्याशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.