भारतात पहिलीच ‘पाद स्पर्धा’ : मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्यांंना मिळणार बक्षीसं

RS5221 163837122

सुरत (वृत्तसंस्था) भारतात पहिलीच ‘पाद स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. ‘व्हॉट द फार्ट’ ही स्पर्धा सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत स्पर्धेत मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्यांना बक्षिसं मिळणार आहे.

 

गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांनी ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्या व्यक्तीला चषका सोबत पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. १०० रुपये भरून या स्पर्धेसाठी तुम्हाला नोंदणी करता येणार आहे.

 

चीन, अमेरिका या देशांमध्ये पादण्याच्या स्पर्धा होतात. इतकंच नव्हे तर त्याचा वर्ल्ड कपसुद्धा आहे. पण भारतात आतापर्यंत अशी स्पर्धा झालीच नाही. त्यामुळे भारतातील ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. दरम्यान, माझ्या कुटुंबीयांसोबत सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा चित्रपटगृहात मी मोठ्याने पादलो. एकजण माझ्यावर हसला आणि म्हणाला की पादण्याची स्पर्धा असल्यास तुम्हीच त्यात जिंकणार. त्यावेळी माझ्या डोक्यात या स्पर्धेविषयीचा विचार आल्याचे यतिन संगोई यांनी सांगितले आहे.

Protected Content