मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षातर्फे याबाबत पत्र जारी करून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
अखिल भारतीय महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सुष्मिता देव, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांनी ही निवड केली आहे. संध्या सव्वालाखे या १९९७ पासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असून त्या तीन वेळा यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या. तर २००२ ते ०७ या कालावधीत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. यातच आता त्यांची महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.