मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणूकीत संदीप चव्हाणांच्या पॅनलचा दणदणीत विजय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील पत्रकारांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत अखेर ‘परिवर्तन’ झाले आहे. २९ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी समर्थ पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. संदीप चव्हाण हे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले असून त्यांच्या विजयामुळं पत्रकारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यातील सर्वात जुनी पत्रकार संघटना असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक दर दोन वर्षांनी होते. यावेळी अनेक तरुण व अनुभवी पत्रकारांनी आपापल्या मागण्या हिरीरीनं मांडल्यामुळे ही निवडणूक चर्चेची ठरली होती. संदीप चव्हाण आणि सुकृत खांडेकर यांचं पॅनल अशी सरळ लढत होती. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच परिवर्तन पॅनलचं पारडं काहीसं जड दिसत होतं. प्रत्यक्षात तसंच झाले. परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांना तब्बल ३१६ मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी सुकृत खांडेकर यांना केवळ १६० मतांवर समाधान मानावे लागले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकी इतकीच यावेळी संघाची सर्वसाधारण सभा गाजली. यावेळी अनेक तरुण पत्रकार संघाच्या कारभाराची आधीच माहिती घेऊन तयारीनिशी सभेला आले होते.

Protected Content