मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रोडवरील भर रस्त्यावर काही बांधकाम धारकांनी रस्त्यावरच वाळू टाकल्याने दुचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक होत असल्याचे समोर आले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व नगरपंचायत यांनी लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रोडवर अनेक ठिकाण बांधकाम सुरूआहे. या ठिकाण मुख्य रस्त्यावर काही बांधकाम करणाऱ्यांनी वाळूचे ढिग टाकण्यात आले आहे. वाळू हळूहळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकीचा अपघात होत असून चालक जखमी होत आहे. त्यात रविवारी देखील याचपध्दतीने एक वृध्द दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाले होते. दरम्यान याचा नागरीकांना मोठा त्रास होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपंचायत यांनी लक्ष देवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.